Devendra Fadanvis VidhanParishad Speech:फडणवीसांकडून राम शिंदेंच्या राजकीय प्रवासावर भाष्य करत कौतुक

Continues below advertisement

Devendra Fadanvis VidhanParishad Speech:फडणवीसांकडून राम शिंदेंच्या राजकीय प्रवासावर भाष्य करत कौतुक

 

 'मी पुन्हा येईन' हे वाक्य निर्विवादपणे प्रत्यक्षात उतरवत पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी विधानसभेतील आपले पहिले भाषण केले. या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे सर्व विषयांना हात घालत विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासोबतच राज्यातील नागरिकांना आश्वस्त केले. तसेच आपली जात ही महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने गौण मुद्दा असल्याचे सांगत जनतेने आपले नेतृत्व कोणताही किंतू परंतु मनात न ठेवता स्वीकारल्याचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक अधोरेखित केला. (Maharashtra Assembly Winter Session 2024) 

गेल्या पाच वर्षांत व्यक्तिगत मला आणि माझ्या कुटुंबाला ज्याप्रकारे टार्गेट करण्यात आले, महाराष्ट्रात हा रेकॉर्ड असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत सहा-सात लोक फक्त माझ्यावर बोलायचे. पण त्यांचे आभार, ते माझ्यावर बोलत राहिल्यामुळे लोकांच्या मनात माझ्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. जनतेने पाच वर्षांचे माझे काम बघितले होते. जात, धर्माचा विचार न करता सर्वजनहिताय , सर्वजनसुखाय, असे काम मी केले होते. जात जेवढी राजकारण्यांच्या मनात आहे, तेवढी जनतेच्या मनात नाही, हे यंदाच्या निवडणुकीने दाखवून दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram