Devdut Bus Scam : 'देवदूत शीघ्र प्रतिसाद' वाहन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा Special Report
मुंबई : कोविड काळात (Coronavirus) राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असताना मदत व पुनर्वसन विभागाने काही निर्णय घेतले आणि याच निर्णयांमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याच समोर आले आहे. वित्त विभागाचा विरोध असतानाही या विभागाने शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. बाजारभावाप्रमाणे 25 ते 30 लाखात मिळणारे वाहन आणि साहित्य तब्बल या विभागाने तीन कोटीच्या घरात खरेदी केल्याचा प्रताप या विभागाने केलाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच समोर आले आहे.