Nashik RTO बदल्यांमागे गैरव्यवहाराचा आरोप, Deputy RTO बजरंग खरमाटे यांची खुली चौकशी होणार
Continues below advertisement
वादग्रस्त Deputy RTO बजरंग खरमाटे यांच्यावरील आरोपांच्या खुल्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. लोकायुक्तांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारनं ही माहिती दिली आहे. खरमाटे यांची खुली चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी केली होती. यापूर्वी अनिल देशमुख प्रकरणात ईडीकडूनही खरटमाटेंची चौकशी करण्यात आली होती. RTO विभागातील बदल्यांमध्ये बजरंग खरमाटे यांनी लाखो रुपये कमवल्याचा आरोप आरटीओ अधिकारी गजेंद्र पाटील यांनी केला आहे.
Continues below advertisement