Eknath Shinde on Mahayuti : सगळ्या निवडणुका महायुतीच जिंकेल, एकनाथ शिंदेंचा विश्वास

Continues below advertisement
ठाण्यातील तलाव पाळी येथे दिवाळी पहाट कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचे स्मरण केले. 'गेल्या वर्षी तुम्ही म्हटलं होतं की लँडस्लाइड विक्ट्री मिळणार आणि यावर्षी तुम्हाला मिळालेली आहे', या प्रश्नावर शिंदे म्हणाले, 'सगळ्या लोकसभा महायुती जिंकली, विधानसभा महायुती जिंकली, स्थानिक स्वराज्य समित्या महायुतीचाच भगवा झेंडा फडकलेला आहे'. शिंदे यांनी सांगितले की, धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेले सण-उत्सव मोठ्या स्वरूपात साजरे करण्याची परंपरा कार्यकर्ते पुढे नेत आहेत. यावर्षीची दिवाळी तरुणाईच्या उत्साहात आणि आनंदात साजरी होत असल्याचेही ते म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola