Devendra Fadnavis On MVA : म्हणून शरद पवार आज त्यांच्यासोबत गेले नाहीत
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी राज्यातील विरोधकांवर जोरदार टीका केली आहे, तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नागपुरात (Nagpur) मोर्चाची घोषणा केली आहे. 'जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत, केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतायत', असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विरोधक गोंधळलेले असून त्यांचा दोन दिवसांचा प्रयत्न पूर्णपणे 'फियास्को' ठरला आहे, असेही ते म्हणाले. विरोधकांमध्ये ज्यांना राजकारण समजते ते फक्त पवार साहेब आहेत आणि म्हणूनच ते आज त्यांच्यासोबत गेले नाहीत, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू २८ ऑक्टोबरला नागपुरात 'महा एल्गार मोर्चा' काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement