Ajit Pawar on Kolhapur Corona : गरज पडल्यास कोल्हापूरात नियम अधिक कडक केले जातील : अजित पवार

Continues below advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा अनलॉकच्या चौथ्या स्तरात आहे. त्यामुळे नियम शिथिल केले जाणार नाहीत. उलट गरज पडल्यास नियम अधिक कडक केले जातील, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावळी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरायला लागली आहे, मात्र कोल्हापुरात वातावरण अजूनही तसंच आहे. पहिल्या लाटेत कोल्हापुरात कोरोना आटोक्यात आणला होता. परंतु कोल्हापुरात कोविड पॉझिटिव्हिटीचा रेट सर्वाधिक आहे. सध्या हा जिल्हा अनलॉकच्या चौथ्या स्तरात आहे. त्यामुळे नियम शिथिल केले जाणार नाहीत. उलट नियम अधिक कडक केले जातील. कोल्हापूरकरांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. नागरिक अजूनही मास्क वापरत नसल्याचं समोर येत आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसंच जिल्ह्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी गृह विलगीकरण कमी करुन संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram