Ajit Pawar in Satara: 'मला अनेक ठिकाणी टार्गेट केलं जातं'; अजित पवारांचा सूचक इशारा
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यातील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात विकास कामांवरून आणि निधीवरून भाष्य केले. 'मला अनेक ठिकाणी टार्गेट केलं जातं', असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी साताऱ्यातील (Satara) एका जाहीर कार्यक्रमात केलं. पूर्वी विरोधात असल्यामुळे विकास कामांना खीळ बसली होती, पण आता महायुतीचे सरकार कामाला जोर देत आहे, असे ते म्हणाले. या भाषणात त्यांनी ७२ च्या दुष्काळाचा उल्लेख करत, संकटातून लोकांना उभं करण्याचं काम सरकार करत असल्याचं सांगितलं. रहिमतपूरच्या (Rahimatpur) बस स्थानकाचा रखडलेला प्रकल्प आणि रस्त्यांच्या कामांसाठी पूर्वी दिलेला सुमारे पन्नास कोटींचा निधी यावरही त्यांनी भाष्य केले. केंद्राकडूनही निधी मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement