Sindhudurg | शिस्टुरा हिरण्यकेशी माशाला जैवविविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्याची मागणी
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीच्या हिरण्यकेशी येथ महादेव मंदिरासमोरील छोट्या कुंडामधून नव्याने शोधलेल्या 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाच्या संवर्धनासाठी आंबोलीकर एकवटले आहेत. जगात केवळ आंबोलीमध्ये सापडणाऱ्या या माशाच्या संवर्धनासाठी मंदिर परिसराला 'जैवविविधता वारसा स्थळा'चा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाचा संशोधन झालं. या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे आणि शंकर बालसुब्रमण्यम यांनी केला.
Continues below advertisement