Delhi : व्हिआयपींची सुरक्षा आता महिला कमांडो,32 महिला कमांडोची एक तुकडी तैनात : ABP Majha

अमित शाह, सोनिया गांधी, प्रियंका - राहुल गांधी किंवा अन्य कोणीही नेते आले की त्यांच्या बाजूला कायमच सुरक्षेसाठी कमांडोचं कडं तैनात दिसतं. या व्हिआयपींची सुरक्षा आता महिला कमांडो करणार आहेत. सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा देणाऱ्या कमांडोमध्ये 32 महिला कमांडोची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह, गांधी परिवार, आणि अन्य महत्वाच्या व्यक्ती यांच्या झेड प्लस सुरक्षेसाठी या महिला कमांडो यापुढे तैनात असतील. या महिला कमांडोना १० आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सुरवातीला या महिला कमांडोजची तैनाती दिल्लीपुरती मर्यादित असेल आणि डझनभर व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी या कमांडो तैनात असतील

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola