Delhi Blast : स्फोटात वापरलेली i20 कार आमची नाही, Pulwama तील Aamir-Umar च्या कुटुंबीयांचा दावा
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या तपासाचे धागेदोरे आता थेट पुलवामापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी आमिर रशीद मीर, त्याचा भाऊ उमर आणि तारिक दार या तिघांना ताब्यात घेतले आहे. आमिर प्लंबरचे काम करतो, तर तारिक हा टिप्पर चालक आहे. या स्फोटात वापरलेली हरियाणा नंबर प्लेटची i20 कार आणि तिचा मालकी हक्क यावरून तपास गुंतागुंतीचा झाला आहे. आमिर आणि उमरच्या कुटुंबीयांनी, 'घटनेमधली कार ही आमची नाहीच आहे,' असा दावा केला आहे. त्यांची कार घरीच उभी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, ही कार अनेक वेळा विकली गेल्याचे तपासात समोर आले असून, तिचा संबंध फरिदाबादमध्ये नुकत्याच उघडकीस आलेल्या दहशतवादी मॉड्यूलशी जोडला जात आहे, ज्यात काही डॉक्टरांचाही समावेश होता. त्यामुळे दिल्ली पोलीस आणि जम्मू-काश्मीर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement