Delhi Blast : छिन्नविछिन्न मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण, पोलिसांची माहिती
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणी तपास यंत्रणांनी तपास तीव्र केला आहे. न्यायवैद्यक पथकांना घटनास्थळी कोणतेही श्रापनेल किंवा छर्रे आढळले नाहीत. या प्रकरणी पुलवामा येथील डॉ. उमर नबी (Dr. Umar Nabi) नावाच्या डॉक्टरला मुख्य संशयित मानले जात असून, त्याचा संबंध फरिदाबाद येथील दहशतवादी मॉड्यूलशी जोडला जात आहे. तपासादरम्यान, उमरच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, 'आमचा मुलगा निर्दोष आहे, तो फक्त त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होता, आम्हाला विश्वासच बसत नाही की त्याच्यावर असे आरोप लावले जात आहेत.' पोलिसांनी उमरच्या दोन भावांना आणि आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तर डॉ. आदिल (Dr. Aadil) आणि डॉ. मुझम्मिल (Dr. Muzzammil) यांना आधीच अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement