Delhi Car Blast : दिल्ली स्फोटामागे जैशचा हात? २९०० किलो स्फोटकं जप्त

Continues below advertisement
दिल्लीतील स्फोटाच्या (Delhi Blast) तपासात जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय बळावला आहे. याप्रकरणी फरीदाबाद-सहारनपूर मॉड्यूलचा (Faridabad-Saharanpur Module) पर्दाफाश करत पोलिसांनी डॉक्टर आदिल अहमद राथर (Dr. Adil Ahmad Rather) आणि डॉक्टर मुझम्मिल गनई (Dr. Muzammil Ganaie) यांना अटक केली आहे. तपासादरम्यान फरीदाबादमधून (Faridabad) तब्बल २९०० किलो स्फोटकं आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यावर बोलताना संरक्षण विश्लेषक, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणाले, 'ही एक लंबी लढाई आहे ज्याकरता भारतीयांनी तयार राहायला पाहिजे आणि यामध्ये सगळ्या भारतीयांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे'. मे २०२५ मध्ये झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ला (Operation Sindoor) प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी डोळे आणि कान उघडे ठेवावेत असे आवाहन केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola