TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा आढावा : 11 NOV 2025 : ABP Majha

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या कार बॉम्बस्फोटात (Car Bomb Blast) १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा मास्टरमाइंड (Mastermind) पुलवामा येथील डॉक्टर उमर (Dr. Umar) असल्याचा संशय असून, जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत, 'या षडयंत्राचा सखोल तपास केला जाईल, हल्लेखोरांना सोडणार नाही,' असे ठणकावून सांगितले आहे. या प्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. या स्फोटानंतर दिल्लीसह मुंबई, पुणे आणि देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola