Delhi Blast Alert: Lal Qila मेट्रो स्टेशनजवळ भीषण स्फोट, 12 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 2 तरुण.

Continues below advertisement
राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेल्या भीषण स्फोटानं देश हादरला आहे. या स्फोटात आतापर्यंत १२ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये उत्तर प्रदेशातील शामली येथील नोमान आणि मेरठचा रहिवासी असलेल्या मोहसिन या तरुणांचा समावेश आहे. नोमान कॉस्मेटिक्सचा व्यापारी होता, तर मोहसिन ई-रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. या घटनेनंतर पीडितांच्या कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त केला असून एका नातेवाईकाने, 'ऐसी ऐसे लोगों को ऐसी सजा हो ताकि कोई करने की ऐसी हिम्मत न रखे,' अशी संतप्त प्रतिक्रिया देत दोषींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola