Mahaashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, बातम्यांचा वेगवान आढावा

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या कार बॉम्बस्फोटात (Car Bomb Blast) १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय असून, डॉ. उमर (Dr. Umar) हा या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'या षडयंत्राचा सखोल तपास केला जाईल, हल्लेखोरांना सोडणार नाही,' असे ठणकावून सांगितले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (HM Amit Shah) यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आरोपींना सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी हे केंद्र सरकारचे अपयश असल्याची टीका केली आहे. याप्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola