Delhi Blast Probe: 'आत्मघाती हल्ला नाही, घाबरून कच्च्या स्फोटकांचा स्फोट', NIA सूत्रांची माहिती
Continues below advertisement
दिल्लीच्या (Delhi) लाल किल्ला (Red Fort) परिसरातील स्फोटाच्या तपासात NIA ने मोठी माहिती उघड केली आहे. हा स्फोट आत्मघाती हल्ला (Suicide Attack) नसल्याचे NIA च्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. बॉम्ब पूर्णपणे तयार नसताना, केवळ कच्च्या स्फोटकांचा स्फोट घडवण्यात आला. ९ आणि १० नोव्हेंबर रोजी फरीदाबादमध्ये (Faridabad) जवळपास ३००० किलो स्फोटकं जप्त झाल्यानंतर तपास यंत्रणांचा दबाव वाढल्याने घाबरून हा स्फोट घडवला गेला असावा, असा NIA चा प्राथमिक अंदाज आहे. 'स्फोटकं पकडली जातील, या भीतीनं घाबरून स्फोट घडवला', अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. स्फोटानंतर घटनास्थळी मोठा खड्डा किंवा छर्रे न आढळल्याने बॉम्ब अर्धवट असल्याच्या निष्कर्षाला दुजोरा मिळत आहे. NIA कडून दिल्ली एनसीआर (Delhi NCR) आणि पुलवामा (Pulwama) परिसरात छापेमारी सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement