Delhi Blast: दिल्ली स्फोटात अमरोहाच्या दोन मित्रांचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण कार स्फोटात उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. लोकेश अग्रवाल (Lokesh Agarwal) आणि अशोक कुमार (Ashok Kumar) अशी मृतांची नावे असून ते अमरोहाच्या हसनपूर शहरातील रहिवासी होते. स्थानिक आमदार महेंद्र सिंह खडगवंशी यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'लोकेश त्याचा मित्र अशोकला भेटण्यासाठी दिल्लीला गेला होता. दुर्दैवाने, लाल किल्ल्याजवळील स्फोटात दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. हे त्यांच्या कुटुंबीयांसाठी कधीही न भरून निघणारे नुकसान आहे'. लोकेश एका नातेवाईकाला भेटण्यासाठी दिल्लीला आला होता आणि परत जाताना तो त्याचा मित्र अशोकला भेटण्यासाठी थांबला होता, पण त्यांची ही भेट अखेरची ठरली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement