Faridabad Terror Plot: डॉक्टर उमर संपूर्ण हल्ला प्रकरणाचा मास्टरमाईंड, सुत्रांची माहिती
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, फरीदाबाद येथील 'डॉक्टर्स टेरर मॉड्युल'चा म्होरक्या डॉ. उमर मोहम्मद हाच या हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, फरीदाबादमध्ये झालेल्या अटकेच्या भीतीने उमरने दिल्लीत हा स्फोट घडवून आणला. तपासात आतापर्यंत अनेक डॉक्टरांचा सहभाग उघड झाला असून, त्यांच्याकडून एके-४७ रायफल आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डॉक्टर उमर मोहम्मद हा कोणी छोटा-मोठा हस्तक नसून, फरीदाबादच्या हॉस्पिटलमध्ये इतरांना दहशतवादासाठी तयार करणारा तो सरगना होता.' या प्रकरणाचे धागेदोरे जम्मू-काश्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि गुजरातपर्यंत पसरले असून, पोलीस आता उमरच्या फरार साथीदारांचा आणि त्याला मदत करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement