Delhi Blast: दिल्ली स्फोटाला पुलवामा कनेक्शन, Faridabad मधून विकलेल्या कारचा वापर

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटात (Delhi Blast) आता पुलवामा कनेक्शन (Pulwama Connection) समोर आले आहे. या स्फोटात वापरलेली Hyundai i20 कार अनेकवेळा विकली गेली होती आणि तिचा शेवटचा व्यवहार फरिदाबादमधील (Faridabad) रॉयल कार झोन (Royal Car Zone) या डिलरमार्फत झाल्याचा संशय आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित पुलवामाचा रहिवासी असलेला डॉ. उमर मोहम्मद (Dr. Umar Mohammad) असून, तपास यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याच्या (Terror Attack) शक्यतेनुसार UAPA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 'आम्ही सर्व शक्यता शोधत आहोत आणि सर्व शक्यतांचा विचार करून सखोल तपास करू,' असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी सांगितले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोल्चा (Delhi Police Commissioner Satish Golcha) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, मूळ कार मालक मोहम्मद सलमानसह (Md Salman) अनेकांची चौकशी सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola