Delhi Blast: दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, सुरक्षेसाठी Lal Qila तीन दिवस बंद
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला (Lal Qila) मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या शक्तिशाली कार स्फोटानंतर भारतीय पुरातत्व खात्याने (ASI) मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ऐतिहासिक लाल किल्ला ११ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या तीन दिवसांसाठी पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या स्फोटानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) रेल्वे स्टेशनवरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व खात्याने (Archaeological Survey of India) दिलेल्या माहितीनुसार, 'दिल्ली पोलिसांच्या विनंतीनंतर तपास कार्यात सहकार्य करण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी लाल किल्ला तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' या घटनेमुळे दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, अनेक राज्यांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement