Delhi Blast Probe: लाल किल्ल्याजवळ स्फोट, Faridabad मध्ये सापडली संशयित लाल EcoSport गाडी.
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या स्फोट प्रकरणी दिल्ली पोलिसांना (Delhi Police) मोठे यश मिळाले आहे. तपासात एक पांढऱ्या रंगाची i20 गाडी आणि दुसरी लाल रंगाची EcoSport गाडी संशयाच्या भोवऱ्यात होती. आता ही DL10CK0458 क्रमांकाची लाल रंगाची संशयित गाडी फरीदाबादच्या (Faridabad) खंदावली गावातील एका फार्महाऊसजवळून जप्त करण्यात आली आहे. तपास यंत्रणांच्या मते, 'या गाडीतनं सुद्धा दहशतवाद्यांनी, संशयितांनी स्फोटकं नेल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.' ही गाडी सापडल्याने तपासाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे, कारण या गाडीचा वापर हल्ल्यापूर्वी पाळत ठेवण्यासाठी किंवा स्फोटके नेण्यासाठी केला गेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement