Delhi Blast Probe: लाल किल्ला स्फोटामागे डॉक्टर मॉड्यूल? J&K मधून Dr. Tajamul ताब्यात, आकडा 6 वर

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Lal Qila) झालेल्या भीषण स्फोट प्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी (Security Agencies) मोठी कारवाई करत जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) आणखी एका डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे. श्रीनगरच्या SMHS हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर ताजमुलला (Dr. Tajamul) ताब्यात घेतल्याने, या प्रकरणातील डॉक्टरांची संख्या सहावर पोहोचली आहे. 'सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीरमधून दहशतवादाच्या संशयाखाली डॉक्टर ताजमुलला ताब्यात घेतलं,' आणि तो दिल्ली स्फोटातील प्रमुख आरोपी डॉक्टर उमर मोहम्मदच्या (Dr. Umar Mohammed) संपर्कात असल्याचा संशय आहे. तसेच, त्याचा जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेच्या मॉड्यूलशी संबंध आहे का, याचाही तपास यंत्रणांकडून केला जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola