Delhi Blast: लाल किल्ल्याजवळचा स्फोट आत्मघाती हल्ला नाही, NIA च्या तपासात मोठा खुलासा.

Continues below advertisement
दिल्लीच्या लाल किल्ला (Red Fort) परिसरात झालेल्या कार स्फोटाच्या तपासाची सूत्रे राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) हाती घेतली आहेत. हा स्फोट आत्मघाती हल्ला नसल्याचा निष्कर्ष प्राथमिक तपासात समोर आला आहे. 'स्फोटकं पकडली जातील या भीतीनं घाबरून स्फोट घडवला, तसेच बॉम्ब पूर्णपणे तयार झाला नव्हता', अशी माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे. हरियाणातील फरीदाबादमध्ये (Faridabad) सुमारे २,९०० किलो स्फोटकं जप्त केल्याच्या कारवाईमुळे दबाव वाढून हा स्फोट घडल्याचा संशय आहे. स्फोटानंतर घटनास्थळी मोठा खड्डा किंवा खिळे-छर्रे न आढळल्याने बॉम्ब अर्धवट असल्याच्या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे. एफएसएलच्या (FSL) टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असून, तपास सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola