Delhi Blast : 'दिल्लीतील स्फोटाची घटना हृदयत्रावक', CM Devendra Fadnavis यांनी वाहिली श्रद्धांजली.
Continues below advertisement
दिल्लीतील (Delhi) लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या भीषण कार स्फोटात (Car Blast) अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी X वर पोस्ट करत या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेली स्फोटाची घटना हृदयत्रावक आहे'. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या स्फोटानंतर दिल्लीसह मुंबईतही (Mumbai) हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला असून, दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) यांसारख्या तपास यंत्रणांकडून घातपाताच्या शक्यतेची चौकशी केली जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement