Delhi Terror Alert : दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला? Faridabad मधून २ डॉक्टर, ७ दहशतवाद्यांना अटक

Continues below advertisement
दिल्लीतील (Delhi) स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्याचा संबंध फरीदाबादमधील (Faridabad) मोठ्या कारवाईशी जोडला जात आहे. फरीदाबाद येथील एका मेडिकल कॉलेजमधून जम्मू-काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाईत मोठा शस्त्रसाठा आणि सुमारे २९०० किलो स्फोटके जप्त केली आहेत. या प्रकरणी दोन डॉक्टरांसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात UP चे डॉक्टर आदिल आणि हरियाणाचे डॉक्टर मुजम्मिल यांचा समावेश आहे. तपास यंत्रणांच्या हवाल्याने सूत्रांनी सांगितले की, 'दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता आहे.' फरीदाबादमधील कारवाईनंतर हा स्फोट घडल्याने दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे आणि अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola