Delhi Terror Alert: 'सर्व शक्यता तपासून सखोल चौकशी होणार', गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य.
Continues below advertisement
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये भीषण स्फोट होऊन राजधानी हादरली आहे, या घटनेत ८ जण ठार झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'सर्व शक्यता तपासून सखोल चौकशी केली जाईल' असे सांगितले आहे. शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्त आणि गुप्तचर विभागाच्या संचालकांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला असून, घटनास्थळालाही ते भेट देणार आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) यांचे पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक व न्यायवैद्यक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. या स्फोटामुळे दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement