Delhi Blast: 'स्फोटामागे घातपात आहे का?' अमित शहा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी NSG कमांडो दाखल

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) परिसरात झालेल्या स्फोटानंतर (Blast) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 'हा स्फोट वेगळ्या पद्धतीनं झाल्याचं बोललं जातंय, या पाठीमागे काही घातपात आहे का, याचा तपास एनएसजीचे कमांडो (NSG Commandos) करत आहेत,' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शहा यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून जखमींची विचारपूस केली असून, ते लवकरच घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट देणार आहेत. अमित शहा पोहोचण्यापूर्वीच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) पथक घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी परिसराची पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे. या स्फोटात काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता असून अनेक जण जखमी झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola