Delhi Car Blast: 'गाडीचा वापर दहशतवाद्यांकडून...?', लाल किल्ल्याजवळच्या स्फोटामागे कटाचा संशय

Continues below advertisement
दिल्लीतील (Delhi) लाल किल्ला (Red Fort) मेट्रो स्टेशनजवळ एका गाडीत झालेल्या स्फोटामुळे (Blast) मोठी खळबळ उडाली आहे. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत (Fire) जवळपास तीन ते चार गाड्या जळून खाक झाल्या असून, पोलीस (Police) आणि अग्निशमन दल (Fire Brigade) घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून 'लोकांनी शांतता ठेवून कोणत्याही प्रकारे अफवेवर विश्वास ठेवू नये' असे आवाहन करण्यात आले आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ हा स्फोट झाला. हा परिसर अत्यंत संवेदनशील आणि गजबजलेला असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. गाडीतील तांत्रिक बिघाड, सीएनजी किटचा स्फोट किंवा यामागे काही कट आहे का, अशा सर्व बाजूंनी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून तपास सुरू आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola