Delhi Blast: 'ब्लास्टचं कारण लवकरच कळेल', गृहमंत्री Amit Shah यांचा थेट संदेश, तपास यंत्रणांना आदेश
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाने (Car Bomb Blast) देश हादरला आहे. या घटनेत आतापर्यंत १३ जण ठार झाले असून अनेकजण जखमी आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक थेट आणि क्लीन संदेश दिला आहे की, 'काही वेळातच तपास यंत्रणांकडनं जो तपास केला जातोय त्यामुळे ब्लास्टचं जे काही प्रमुख कारण आहे ते कळू शकेल', अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गृहमंत्री स्वतः घटनास्थळी आणि जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. NIA आणि NSG सह सर्व प्रमुख तपास यंत्रणा (Investigative Agencies) घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातील, असेही शाह यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement