Delhi Blast: 'Faridabad आणि Delhi स्फोटाचा संबंध', सूत्रांची माहिती, तपासाला वेग

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या भीषण स्फोटानंतर तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. घटनास्थळावरून मानवी अवशेष आणि इतर नमुने गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम (FSL) आणि एनएसजीचे (NSG) पथक दाखल झाले आहे. आमचे प्रतिनिधी सुरज ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूत्रांनी सांगितले की, 'फरीदाबाद येथे जे केमिकलचा साठा मिळाला होता त्याचबरोबर दिल्ली जो स्फोट झालेला आहे त्याचा लिंक असल्याचा त्यांना प्राथमिक तपासात समोर येत आहे'. या स्फोटाच्या काही तास आधी फरीदाबादमधील एका मेडिकल कॉलेजमधून सुमारे २९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती आणि दोन डॉक्टरांसह सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. दिल्लीतील स्फोट आणि फरीदाबादमधील कारवाईचा संबंध असल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून वर्तवली जात असून, दोन्ही ठिकाणच्या नमुन्यांची आता पडताळणी केली जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola