Delhi Blast: 'सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर रहा', उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे आदेश
Continues below advertisement
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. 'सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याचे' आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. दिल्लीतील स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मुंबईतील CSMT, दादर, चर्चगेट यांसारख्या गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. दिल्लीत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत असून, मुंबई पोलीस देखील संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवून आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement