MVA Congress Election : 'मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार', Vijay Wadettiwar यांची घोषणा; आघाडीत पुन्हा गोंधळ.

Continues below advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीवरून (BMC Elections) काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबईत पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. 'आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलंय की आम्ही स्वतंत्र लढणार,' असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. मात्र, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी अंतिम निर्णय निवडणुका जाहीर झाल्यावरच होईल असे सांगून वेगळी भूमिका मांडली आहे. दुसरीकडे, फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पक्षाचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (SIT) स्थापन करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola