Delhi Pollution: 'सरकार अपयशी, आकडे लपवत आहे', इंडिया गेटवर नागरिक आक्रमक
Continues below advertisement
देशाची राजधानी दिल्लीला प्रदूषणाने मोठ्या प्रमाणात विळखा घातला असून वाढत्या प्रदूषणाविरोधात दिल्लीकर रस्त्यावर उतरले आहेत. 'रेखा गुप्ता यांचे सरकार वाढते प्रदूषण कमी करण्यात अपयशी ठरत आहे आणि हवेच्या गुणवत्तेचे आकडे लपवत आहे', असा आरोप आंदोलकांनी केला. इंडिया गेटसमोर झालेल्या या आंदोलनावेळी नागरिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दिल्लीतील हवेची गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीत पोहोचली असून अनेक भागांमध्ये AQI ४०० च्या वर गेला आहे. आंदोलनादरम्यान, दिल्ली पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी लोकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आणि शक्य असल्यास घरून काम करण्याचे आवाहन केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement