Delhi Car Blast: i20 कारचा मार्ग उघड, Haryana-Badarpur सीमेवरुन Delhi मध्ये एंट्री

Continues below advertisement
दिल्लीतील कार स्फोट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून, स्फोटासाठी वापरलेल्या Hyundai i20 कारचा मार्ग उघड झाला आहे. ही कार दिल्ली-हरियाणा बदरपूर सीमेवरून दुपारी ३ वाजून १८ मिनिटांनी दिल्लीत शिरल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर ही कार जामा मशीद परिसरातील सुनेहरी मशिदीजवळच्या पार्किंगमध्ये जवळपास तीन तास उभी होती. या प्रकरणातील एका संशयिताचा फोटोही तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. यावर आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, 'ही कार कुठे अन्यत्र नेऊन उडविण्याचा इरादा होता का? किंवा त्यावेळेसची परिस्थिती पाहून नवी दिल्लीत शिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणी असलेली कडक सुरक्षा व्यवस्था पाहून इथेच कार थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि नंतर मग ही कार संध्याकाळी बरोबर मोक्याची वेळ असताना गर्दीच्या वेळी तिथे उडविण्यात आली का?'
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola