Delhi Blast: Amit Shah यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक, हल्ल्यामागे कोण असू शकतं यावर चर्चा.
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर (Delhi Blast) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत गृहसचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, एनआयएचे (NIA) महासंचालक आणि दिल्ली पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 'आम्ही दिल्ली पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत,' असे सीआरपीएफच्या (CRPF) वतीने सांगण्यात आले आहे. दिल्ली पोलीस या स्फोटासंदर्भात अधिकृत माहिती देणार असून, या हल्ल्यामागे कोण असू शकते आणि तो कसा घडवला गेला यावर बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. या घटनेनंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement