Delhi Blast: 'ब्लास्ट इतना जबरदस्त था की मंदिर के झूमर तक सारे हे गये', प्रत्यक्षदर्शीचा दावा

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या बॉम्बस्फोटानंतर (Delhi Bomb Blast) देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या स्फोटाचे फरीदाबाद कनेक्शन (Faridabad Connection) समोर आले असून, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही (Maharashtra) सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनवर (Pune Civil Court Metro Station) पोलिसांचा आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाचा (BDDS) बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने स्फोटाची भीषणता सांगताना म्हटले, 'ब्लास्ट इतना जबरदस्त था की मंदिर के झूमर तक सारे हे गये'. स्फोटानंतर सुमारे ४५ मिनिटे काय झाले हे कोणालाच कळत नव्हते, असेही त्याने सांगितले. या स्फोटात अनेक गाड्यांचे नुकसान झाले असून, तपास यंत्रणा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola