Delhi Blast Probe: पोलिसांची मोठी कारवाई, Paharganj-Daryaganj हॉटेल्समधून ४ संशयित ताब्यात

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) परिसरात झालेल्या स्फोटानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) रात्रभर शोधमोहीम राबवली आहे. या कारवाईत पहाडगंज (Paharganj) आणि दरियागंज (Daryaganj) परिसरातील हॉटेल्सवर छापे टाकण्यात आले, जिथून चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या हॉटेल्समध्ये जे जे म्हणून काही गेस्ट राहायला आलेले असतील त्या सगळ्यांवरती आता पोलिसांकडून करडी नजर आहे आणि या सगळ्यांचे रजिस्टर चेक करुन या सगळ्यांपैकी जे चार संशयित पोलिसांना वाटतायत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे'. या दाटीवाटीच्या आणि गर्दीच्या परिसरात हॉटेल्समधील पाहुण्यांची ओळखपत्रे आणि इतर नोंदी तपासल्या जात आहेत. या चौकशीतून स्फोटासंदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola