Delhi Blast Amit Shah : लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण गाडीच्या स्फोटानंतर (Car Blast) देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. 'सर्व शक्यतांचा विचार आम्ही केलेला आहे', असे महत्त्वपूर्ण विधान गृहमंत्री अमित शहांनी केले आहे, ज्यामुळे हा दहशतवादी हल्ला (Terror Attack) असल्याच्या शक्यतेला बळकटी मिळाली आहे. या स्फोटाची तीव्रता मोठी असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेचे धागेदोरे नुकत्याच फरिदाबादमध्ये (Faridabad) झालेल्या कारवाईशी जोडले जात आहेत, जिथे जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) आणि अन्सार गझवत-उल-हिंद (Ansar Ghazwat-ul-Hind) या दहशतवादी संघटनांशी संबंधित एक मोठे टेरर मॉड्यूल उघडकीस आले होते. त्यामुळे हा स्फोट म्हणजे त्या कारवाईचा बदला घेण्यासाठी केलेला कट होता का, या दिशेने तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करत असून NIA आणि NSG सारख्या वरिष्ठ यंत्रणा तपास करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement