Delhi Blast Probe: दिल्ली स्फोटाचा तपास NIA कडे, गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय.

Continues below advertisement
दिल्लीतील स्फोटाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश ATS, गुजरात ATS, जम्मू-काश्मीर पोलीस आणि NSG कमांडो अशा अनेक यंत्रणा घटनास्थळी तपास करत होत्या. प्राथमिक तपासात दहशतवादी हल्ल्याचा संशय आल्याने हा तपास NIA कडे वर्ग करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तपासाचा आढावा घेतला असून, पुढील रणनीती ठरवण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या हल्ल्यामागे कोणते दहशतवादी मॉड्यूल आहे, स्फोटके देशात कशी पोहोचली आणि याचा पाकिस्तान किंवा इतर देशांशी संबंध आहे का, यासह सर्व बाजूंनी NIA आता तपास करणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola