Prakash Ambedkar On Delhi Bast: स्फोटात अंतर्गत शक्तीचा हात आहे का? प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भिवंडी (Bhiwandi) निवडणुकीदरम्यान झालेल्या स्फोटावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. या घटनेला त्यांनी सरकारचे संपूर्ण अपयश म्हटले आहे. 'हे पूर्णपणे सरकारचं फेल्युअर आहे, मस्तीत आलेलं सरकार होतं,' असे खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच, या स्फोटासाठी वापरलेले साहित्य संघाच्या कार्यकर्त्यांकडे सापडले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी (Investigation) झाली पाहिजे आणि भविष्यात अशा घटना थांबवण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत, अशी मागणीही आंबेडकरांनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement