Delhi Blast: दिल्ली स्फोटानंतर HM Amit Shah यांची उच्चस्तरीय बैठक, NIA, IB प्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित.

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एक उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेतली. या बैठकीला गृहसचिव गोविंद मोहन, आयबी संचालक तपन डेका, एनआयएचे महासंचालक सदानंद दाते आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात हे देखील या बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले होते. या बैठकीत स्फोटाच्या तपासाची सद्यस्थिती, देशभरातील अंतर्गत सुरक्षा आणि दहशतवादविरोधी अभियानांच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. विविध तपास यंत्रणांनी घटनास्थळावरून गोळा केलेले पुरावे आणि त्यांच्या विश्लेषणाची माहिती गृहमंत्र्यांना देण्यात आली. या हल्ल्यामागे कोणत्याही आंतरराष्ट्रीय शक्तीचा हात आहे का, यासह सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola