Delhi Blast : अमित शहांची उच्चस्तरीय बैठक, तपासाचा घेतला आढावा
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय सुरक्षा बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) महासंचालक सदानंद दाते (Sadanand Date), दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा (Satish Golcha) आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात (Nalin Prabhat) हे उपस्थित होते. बैठकीमध्ये 'आत्तापर्यंत झालेला तपास, मेडिकल डीएनए कलेक्शन, मृतांची ओळख पटवणे आणि पुराव्यांच्या दृष्टीने विशेष चर्चा झाल्याचे' समजते. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, तपास यंत्रणांनी या घटनेचा तपास वेगाने सुरू केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement