Delhi Blast: 'प्रथम दर्शनी हा बॉम्बस्फोटच वाटतो', लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेंचा मोठा दावा

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या गाडीच्या स्फोटानंतर खळबळ उडाली आहे, यावर संरक्षण विश्लेषक लेफ्टनंट कर्नल (माजी) सतीश ढगे (Lt Col Satish Dhage) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या घटनेवर बोलताना ढगे म्हणाले, 'प्रथम दर्शनी तरी हा बॉम्ब स्फोटच त्या ठिकाणी वाटतो'. या स्फोटाच्या काही दिवस आधीच, राष्ट्रीय राजधानी परिसरात (NCR) मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाला होता. हरियाणातील फरीदाबाद (Faridabad) येथून डॉक्टर आणि इतर संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून सुमारे ३६० किलो स्फोटकं, २० टायमर आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. मे २०२५ मध्ये झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) नंतरही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना भारतात सक्रिय असल्याचे ढगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे लाल किल्ल्याजवळील स्फोटाचे धागेदोरे फरीदाबादमध्ये झालेल्या कारवाईशी जुळतात का, या दिशेने आता तपास सुरू होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola