Pune Protest: पुण्यात आंबेडकरी संघटना आक्रमक, मोहोळंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या

Continues below advertisement
पुण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या कार्यालयावर आंबेडकरी संघटनांनी मोर्चा काढला आहे. 'राज्याचं सरकार हे आंबेडकरी समाजाची फसवणूक करतंय', असा थेट आरोप आंदोलकांनी केला आहे. पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे (Ambedkar Sanskrutik Bhavan) विस्तारीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही जागा एका खाजगी कंपनीला दिल्याचा आरोप करत, 'ही जागा आमची आहे' अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलकांनी मोहोळ यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. पोलिसांनी आंदोलकांना अडवले असून, त्यांच्यासोबत वाटाघाटी सुरू आहेत. या प्रश्नी तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola