Delhi Blast :Pakistan मधील कुरापती, बहावलापूरच्या जैशच्या मुख्यालयात दहशतवाद्यांची गुप्त बैठक -सूत्र

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर (Delhi Blast) पाकिस्तानच्या (Pakistan) बहावलपूर (Bahawalpur) येथील जैश-ए-मोहम्मदच्या (JeM) मरकज उस्मान ओ अली या मुख्यालयात भीतीचे वातावरण आहे. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा (Maulana Masood Azhar) भाऊ तल्हा अल सैफने (Talha Al Saif) दहशतवादी कमांडर्सची तातडीची बैठक बोलावली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'भारतीय सेनेच्या (Indian Army) कारवाईच्या भीतीने जैश ए मोहम्मदच्या एकवीस दहशतवादी अड्ड्यांपैकी आठ अड्डे रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत'. या महत्त्वपूर्ण बैठकीला मौलाना मसूद अजहर स्वतः उपस्थित नव्हता, ज्यामुळे त्याच्या सद्यस्थितीबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. भारतीय तपास यंत्रणा दिल्ली स्फोटाचा तपास करत असतानाच जैशच्या गोटात उडालेली ही खळबळ दोन्ही देशांमधील तणाव वाढवणारी आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola