Delhi Blast Alert: दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्र हाय अलर्टवर, मुंबई-पुणे-नागपुरात सुरक्षा वाढवली

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सारख्या गर्दीच्या ठिकाणी आणि नागपूरमधील संवेदनशील असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागपूरमधील वार्ताहर तुषार कोहळे यांनी माहिती दिली की, 'नागपूरच्या संघ मुख्यालयाची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे कारण की ते तिहेरी स्वरुपाच्या सुरक्षा घेरा इथे पाहायला मिळते जो आतमधला पहिला घेरा आहे तो सीआयएसएफ कडे आहे.' मुंबईतही रेल्वे स्थानकांवर डॉग स्कॉडच्या मदतीने तपासणी केली जात आहे आणि संशयित व्यक्तींची चौकशी होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola