Delhi Blast: 'सर्व अँगलने तपास करू', गृहमंत्री Amit Shah यांचा इशारा; मृतांचा आकडा ८ वर

Continues below advertisement
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाने (Delhi Blast) राजधानी हादरली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 'आम्ही सर्व अँगल खुले ठेवून या घटनेचा तपास करत आहोत', असे स्पष्ट मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले आहे. या भीषण स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस स्पेशल सेल, क्राईम ब्रांच, एनआयए (NIA), एसपीजी (SPG) आणि एफएसएलच्या (FSL) टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गृहमंत्र्यांकडून घटनेची प्राथमिक माहिती घेतली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली असून, या प्रकरणी उद्या गृहमंत्रालयात उच्चस्तरीय बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola