Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ कारमध्ये शक्तिशाली स्फोट, दिल्लीत हाय अलर्ट जारी, घातपाताचा संशय

Continues below advertisement
दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ एका गाडीत संध्याकाळी सुमारे पावणेसात वाजता मोठा स्फोट झाल्याने राजधानी हादरली आहे. 'हा एक बॉम्ब स्फोट असू शकतो,' असा अंदाज संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या स्फोटानंतर गाडीने पेट घेतला आणि आजूबाजूच्या तीन ते चार गाड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या घटनेत काही जण जखमी झाले असून काहींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या मोठ्या कोंबिंग ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने याकडे गंभीरपणे पाहिले जात आहे. या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीत आणि देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola