Delhi Blast: लाल किल्ला स्टेशनजवळ स्फोटात 12 ठार, Jaish-e-Mohammed शी संबंधित Doctors चा सहभाग असल्याचा संशय
Continues below advertisement
राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ (Lal Qila Metro Station) झालेल्या कार बॉम्बस्फोटात (Car Bomb Blast) १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) UAPA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. दिल्ली स्फोटामागे जैश-ए-मोहम्मदशी (Jaish-e-Mohammed) संबंधित 'व्हाइट कॉलर' दहशतवादी मॉड्यूलचा (White Collar Terror Module) हात असल्याचा संशय असून, याच प्रकरणी अटक केलेल्या डॉक्टर्सपैकी एक डॉ. उमर मोहम्मद (Dr. Umar Mohammad) हा स्फोट झालेल्या गाडीत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दहशतवादी मॉड्यूलचा भाग असल्याच्या संशयावरून डॉ. आदिल रादर (Dr. Adil Rather), डॉ. मुझम्मिल शकील (Dr. Muzammil Shakeel) आणि डॉ. शाहीन शाहीद (Dr. Shaheen Shahid) यांनाही अटक करण्यात आली आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून फरीदाबादमध्ये (Faridabad) सुमारे २९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती, ज्याचा संबंध या स्फोटाशी जोडला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement