Delhi Blast: 'प्रियजनांना गमावलेल्यांप्रती संवेदना', PM Narendra Modi यांची X पोस्टद्वारे प्रतिक्रिया

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या कार स्फोटानंतर (Delhi Blast) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया दिली आहे. या भीषण घटनेत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'दिल्लीत आज संध्याकाळी झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना.' त्यांनी पुढे असेही सांगितले की त्यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि बाधितांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola